बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी मिळण्यास सुरुवात झाली

बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी मिळण्यास सुरुवात झाली

महाराष्ट्रात इमारत व बांधकाम क्षेत्र व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगार आता गृह उपयोगी साहित्य मिळण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात 2021 मध्ये जीआर काढलेला होता त्यानुसार बांधकाम कामगार यांना गृह उपयोगी साहित्य भांडे आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. या संदर्भात माहिती पाहू

बांधकाम कामगारांच्या अनेक समस्या आहेत कधी एक रोजगार सोडून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी स्थलांतरित जावे लागते. तेथे गेल्यावर नव्या ठिकाणचे वास्तव्य, पाल्यांचे शिक्षण, रोजगार व भोजन हे त्याला जुळवून घ्यावे लागते. या अनेक समस्या पाहून सरकारने बांधकाम कामगारांना अनेक योजना काढल्या आहेत त्या पैकी एक असे म्हणता येईल की ‘ बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य भांडे देण्यास मंजुरी दिली होती जवळ जवळ १० लाख भांडे सेट ( सक्रिय कामगारांना ) वाटण्या संदर्भात २७.१०.२०२० च्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम कामगार ऑफिस किंवा जिल्हा WFC मध्ये हे गृह उपयोगी भांडे देण्यास आता सुरुवात झालेली आहे.

bandhkam kamgar bhandi denyas

 

गृह उपयोगी वस्तू संच कोणाला मिळणार !

बांधकाम कामगार या योजने मध्ये जे नोंदणी कृत आहेत तसेच जे बांधकाम कामगार सक्रिय आहेत त्या सर्व बांधकाम कामगार यांना हे गृह उपयोगी साहित्य मिळणार आहे. हे घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे.

नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार म्हणजे काय !

नोंदीत सक्रिय कामगार म्हणजे ज्या बांधकाम कामगारांनी आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार मंडळा कडे WFC कडे नोंदणी केली आहे तसेच ते कार्ड चालू आहे. किंवा कोणतेही renewal बाकी नाही ते सर्व कामगार सक्रिय मध्ये येतात. तसेच ज्याच्या बांधकाम कामगार लॉगिन प्रोफाइल मध्ये कार्ड स्टेटस ॲक्टिव Active दाखवते ते सर्व बांधकाम कामगार सक्रिय कामगार म्हणून ओळखले जातात.

 

शासन निर्णय : गृह उपयोगिता वस्तु संच वाटप मंजुरी ( बांधकाम कामगार यांना भांडे वाटण्यास मंजुरी )

1. नोंदणी कृत तसेच सक्रिय बांधकाम यांना या योजनेचा लाभ राहील

2. जे नोंदणी कृत आहेत तसेच सक्रिय कामगार आहेत त्या सर्व बांधकाम कामगारांनी विहित नमुन्यात मागणी अर्ज ‘ प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त मइवइबाकम ‘ यांच्या नावे करावा.मइवइबाकम म्हणजे ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ ‘ असा आहे

3. गृह उपयोगी भांडे साहित्य मध्ये खालील साहित्याचा समावेश होईल.

ताट – 4 नग
वाट्या – 08 नग
पाण्याचे ग्लास – 04 नग
पातेले झाकणासह – 01 नग ( पाहिले )
पातेले झाकनासह – 01 नग ( दुसरे )
पातेले झाकनासह – 01 नग ( तिसरे )
मोठा चमचा ( भात वाटपा करीता) – 01 नग ( पहिला )
मोठा चमचा ( भात वाटपा करीता) – 01 नग ( दुसरा )
पाण्याचा जग ( २ लिटर ) – 01 नग
मसाला डब्बा ( 07 भाग ) – 01 नग

डब्बा झाकणासह ( 14 इंचासह ) – 01 नग
डब्बा झाकणासह ( 18 इंचासह ) – 01 नग
परात – 01 नग
प्रेशर कुकर – 05 लिटर ( स्टेनलेस स्टील ) – 01 नग
कढई ( स्टील ) – 01 नग
स्टील ची टाकी ( मोठी ) झाकनासह व वरगळासह – 01 नग

एकूण = 30 नग गृह उपयोगी भांड्याचे साहित्य संच दिले जाणार आहे.

 

ताट4 नग
वाट्या08 नग
पाण्याचे ग्लास04 नग
पातेले झाकणासह01 नग ( पाहिले )
पातेले झाकनासह01 नग ( दुसरे )
पातेले झाकनासह01 नग ( तिसरे )
मोठा चमचा ( भात वाटपा करीता )01 नग ( पहिला )
मोठा चमचा ( भात वाटपा करीता)01 नग ( दुसरा )
पाण्याचा जग ( २ लिटर )01 नग
मसाला डब्बा ( 07 भाग )01 नग
डब्बा झाकणासह ( 14 इंचासह )01 नग
डब्बा झाकणासह ( 18 इंचासह )01 नग
परात01 नग
प्रेशर कुकर – 05 लिटर ( स्टेनलेस स्टील )01 नग
कढई ( स्टील )01 नग
स्टील ची टाकी ( मोठी ) झाकनासह व वरगळासह01 नग
एकूण30 नग गृह उपयोगी भांड्याचे साहित्य संच दिले जाणार आहे.

4. गृह उपयोगी वस्तु संच वितरीत करताना नोंदीत सक्रिय लाभार्थी याचे छायाचित्र घेणे व बायो मेट्रिक बोटाचे ठसे घेणे हे अनिवार्य राहील.

 

5. गृह उपयोगी वस्तु संच किंवा बांधकाम कामगार भांडे योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगार यांनी जिल्हा बांधकाम कामगार ऑफिस WFC शी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment