आता मिळणार मिळणार फक्त गृह उपयोगी भांडे , पेटी आता बंद होणार, पहा Bandhkam Kamgar Peti Vatap News

नमस्कार मंडळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यास संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मुंबई यांकडे नोंदणी कृत कामगार आहेत त्यांना आता नवीन आलेल्या अपडेट्स नुसार गृह उपयोगी भांडी मिळण्यास सुरुवात झालेली आहे. या नोंदणी कृत बांधकाम कामगार यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एक पेटी मिळाली होती. आणि आता त्यांनां गृह उपयोगी भांडे साहित्य संच ( 30 नग ) मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

बांधकाम कामगार यांना मिळणार गृह उपयोगी साहित्य संच भांडे योजना bandhkam kamgar bhandi yojana maharashtra

नुकतीच एक बातमी आलेली आहे की, यापुढे काही वर्ष किंवा काही कालावधी साठी पेटी मिळण्यास बंद होणार आहे. शासनाने ही पेटी टेंडर बंद करणार आहे अशी चर्चा आहे . त्यामुळे काही कालावधी साठी या ठिकाणी म्हणू शकतो कि पेटी हि बंद राहील. पण तर नवीन बांधकाम मजूर प्रकरणे मंजूर झाले तर त्यांना काय मिळेल, तर त्यांनां या पुढे गृह उपयोगी साहित्य संच मिळणार आहे. जर तुम्ही नवीन अर्ज मंजुरीला टाकला असेल असेल किंवा नवीन फॉर्म भरला असेल तर त्याला त्याला मंजुरी मिळाली किंवा तुमचा नवीन बांधकाम कामगार फॉर्म मंजूर झाला तर तुम्हाला फक्त कामगार कार्ड, १ रू पावती आणि सोबत गृह उपयोगी साहित्य मिळणार आहे. पेटी यापुढे भेटणार नाही ( काही वर्ष तरी भेटणार नाही ) याची नोंद कामगाराने घेणे गरजेचे आहे.

नवीन बांधकाम कामगार नोंदणी साठी आवश्यक कागद पत्रे Navin Bandhkam Kamgar Nondani Document:

१) कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण जन्म तारखेचे आधार कार्ड झेरॉक्स.

२) रेशन कार्ड झेरॉक्स.

३) बँक पासबुक.

४) फोटो.

५) ग्रामसेवक किंवा ठेकेदार यांस कडील प्रमाणपत्र.

bandhkam-kamgar-Peti-vatap-band-news
Bandhkam-kamgar-Peti-vatap-band-news

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी साठी पात्रता Kamgar Nondani Patrata :

१) भारताचा रहिवासी असावा.

२) वय १८ वर्ष ते ६० वर्ष या दरम्यान असावे.

३) अर्जदार व्यक्ती की कामगार असावी सोबत त्या व्यक्तीने मागील वर्षी ९० दिवस कामगार म्हणून काम केलेले असावे.

गृह उपयोगी साहित्य मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Bhande Milvanyasathi Important Document:

१) बांधकाम कामगार कार्ड

२) १ रुपया भरल्याची पावती.

३) आधार कार्ड झेरॉक्स.

४) रेशन कार्ड झेरॉक्स.

बांधकाम कामगार यांना मिळत असणारी पेटी वाटप किती दिवस बंद असणार आहे ?

नवीन बांधकाम कामगार यांना कार्ड मिळाले की लगेच पेटी मिळत होती. पण या पेटी वाटप साठी शासनाकडून स्थगिती आलेली आहे. या पेटी ऐवजी नवीन कामगारांना गृह उपयोगी साहित्य मिळणार आहे.

गृह उपयोगी साहित्य मिळवण्यासाठी अर्ज असा करा ?

सध्या घाईत आलेल्या गृह उपयोग साहित्य वाटप यासाठी mahabocw कडे म्हणजे कामगार विभागाकडे कोणतीही ऑनलाईन सुविधा नव्हती. त्यामुळे काही काळ लोकसभा इलेक्शन होई पर्यंत ही पद्धत फक्त ऑफलाईन असणार आहे. महाराष्ट्र कामगार विभागा मार्फत यामध्ये सॉफ्टवेअर अपडेशन चालू आहे ते अपडेशन झाले की तुम्ही गृह उपयोगी साहित्य घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून तारीख आणि वार घेऊ शकणार आहे. यामुळे जिल्हा केंद्रात होणारी हेडसाल आणि भ्रष्टाचार यामधून थांबणार आहे.

गृह उपयोगी साहित्य वाटप किती दिवस चालणार आहे ?

नवीन जे गृह उपयोगी साहित्य संच आलेला आहे , हे इलेशन चे आणि आचार संहिता चे महिने सोडले तर ३- ४ वर्ष चालणार आहे. याचे टेंडर सुध्दा निघाले आहे. जे कामगार सध्या गृह उपयोगी साहित्य संच पासून वंचित राहिले आहे त्यांनी रिलॅक्स रहा कारण आचार संहिता संपी की हे वाटप पूर्ववत ४ वर्ष पर्यंत तरी चालू राहणार आहे.

Leave a Comment