झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन अर्ज, 100% अनुदान अर्ज सुरू | Xerox Machine And Silai Machine Online Application

नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण विभागामार्फत झेरॉक्स आणि शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झालेले आहेत या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. हे झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन साठीचे अर्ज व लाभ हे शंभर टक्के अनुदानावरच आधारित आहे. ज्यांना हे झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन पाहिजे असेल त्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि हे पूर्णपणे शंभर टक्के अनुदानावरच आधारित आहे.

झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन अर्ज Xerox Machine And Silai MachineApplication

तुम्हाला माहिती की सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. एक नवीन प्रकारचा रोजगार म्हणून शासनामार्फत किंवा समाज कल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना हे वाटप केले जाणार आहे. चला तर पाहू कोणत्या जिल्ह्यात हे अर्ज सुरू झालेले आहेत.

सध्या झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन साठी अर्ज हे जालना जिल्हा परिषद समाजकालीन विभागांमध्ये सुरू झाले. आता हे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2024.

झेरॉक्स मशीन मिळवण्यासाठी तसेच शिलाई मशीन मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे Xerox Machine And Silai Machine Important Dcoument

दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर

तुमचा जातीचा दाखला

अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड

शाळा सोडल्याचा दाखला

रहिवासी दाखला ग्रामसभेचा ठराव.

इतर आवश्यक कागदपत्रे.

आता हे अर्ज कसे करणार तुम्ही, ज्यांना झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन पाहिजे आहे त्यांनी ही अर्ज एक तर ऑनलाईन करावे नाहीतर जालना जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागांमध्ये हे अर्ज सर्व कागदपत्रासहित जमा करावे.

Zerox Machine And Silai Machine Application
Zerox Machine And Silai Machine Application

लाभार्थी मध्ये कोणाला सुरुवातीला मिळणार – झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन Xerox Machine And Silai Machine Beneficiary

ज्यावेळी हे अर्ज जालना जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडे जाणार आहे यामध्ये सुरुवातीला दिव्यांग व्यक्तींचा विचार केला जाणार आहे त्याच्यानंतर जे मागासवर्गीय लाभार्थी आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे त्यानंतर जे आर्थिक कमकुवत घटक आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे.

शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन साठी किती टक्के अनुदान दिले जाणार आहे Xerox Machine And Silai Machine Anudan

जालना जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत ज्यांनी झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन साठी अर्ज केले आहेत यातून जे पात्र लाभार्थी निवडणार आहेत त्यांनी एक रुपया न देता शंभर टक्के अनुदानावर त्यांना ही झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन दिले जाणार आहेत.

मित्रांनो या शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन अनुदान वाटप या योजनेचा उद्देश प्रमुख रोजगार हा देणे आहे. सध्या वाढलेली बेरोजगारी हे लक्षात घेता जालना जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामार्फत हे वाटप सुरू केले आहे. या योजनेत शिलाई मशीन अंतर्गत घरगुती रोजगार उपलब्ध होईल. तसेच झेरॉक्स मशीन योजनेमुळे जे अपंग असतील किंवा आर्थिक कमकुवत वर्ग असतील किंवा जे मागासवर्गीय असतील त्यांना एक प्रकारचा रोजगार उपलब्ध होणार आहे.

जालना जिल्ह्यामध्ये शिलाई मशीन झेरॉक्स मशीन साठी अर्ज कुठे मिळेल

तुम्ही जर जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन अर्ज पाहिजे असेल तर जालना जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामध्ये हा अर्ज तुम्हाला मिळेल किंवा त्याच्या आसपास असणाऱ्या सेतू केंद्र किंवा झेरॉक्स दुकानांमध्ये हा अर्ज तुम्हाला मिळेल.


Leave a Comment