या कामगारांना सन्मान धन योजनेतून प्रतिवर्षी 10,000 रुपये मिळणार, असा करा अर्ज Sanman Dhan Yojana Gharelu Kamgar 2024 Maharashtra

नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासन नेहमी बांधकाम कामगार आणि घरेलु कामगार यांना नवनवीन योजना आणत असते. याचा फायदा हे कामगार वर्ग घेत असतात. नुकतीच महाराष्ट्र शासनाने कामगारांना साठी एक नवीन योजना आणली आहे नाव आहे, ” सन्मान धन योजना “.

घरेलू कामगार सन्मान धन योजना Gharelu Kamgar Sanman Dhan Yojana :

या सन्मान धन योजनेतून कामगारांना १०,००० रुपये हे आधार लिंक बँक खात्यावर मिळणार आहे. त्यासाठी हे अर्ज कामगारांकडून मागवण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक बांधकाम कामगार आहेत त्याच प्रमाणे अनेक घरेलु कामगार आहेत जे इतरांच्या घरी मदतनीस चे कामे करतात. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही सन्मान धन योजना काढलेली आहे.

sanman Dhan Yojana Gharelu Kamgar Maharashtra 2024
sanman Dhan Yojana Gharelu Kamgar Maharashtra 2024

घरेलु कामगार नोंदणी महामंडळ अधिनियम

घरेलु कामगार याची सुरुवात कशी व कधी झाली हे आधी पह, महाराष्ट्र सरकारने घरात काम करणारे कामगार किंवा घरेलु कामगार यांच्या मंडळा संदर्भात येणाऱ्या मागण्या याचा सकारात्मक विचार घेऊन शासन अधिसूचना ३ नोव्हेंबर २०१० ला काढून अधिनियम हा सुध्दा ३ नोव्हेंबर २०१० ल लागू केला. त्यानुसार या अधिनियम अंतर्गत कलम ३ नुसार १२ ऑगस्ट २०११ ला स्थापन केले. तेव्हापासून घरेलु कामगारांसाठी ( ऑगस्ट २०२३ पासून म्हणजे १२ वर्ष झाले हे घरेलु कामगार मंडळ कार्यरत आहे. ) हे घरेलु कामगार मंडळ घरेलु कामगारांसाठी अनेक योजना आणत असते.

घरेलु कामगार नोंदणी साठी आवश्यक अटी व कागद पत्रे ( महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ नुसार ) Gharelu Kamgar Registration important Document :

१) वयाची १८ वर्ष पूर्ण कमीत कमी पाहिजे घरेलु कामगार होण्यासाठी, जास्तीत जास्त ६० वर्षा पर्यंत या मध्ये नोंदणी करता येते.

२) घरेलु कामगार यांचे घरमालकाकडून दिले जाणारे प्रमाण पत्र यांवर त्यांची सही ( अर्ज नमुना हा खाली दिलेला आहे ).

प्रत्येकी घरेलु कामगार यांना मिळणार १०,००० रुपये मदत gharelu Kamgar 10000 Rs helps by goverment:

महाराष्ट्र शासनाने ज्या घरेलु कामगार यांचे वय ५५ वर्ष होईल त्या सर्व घरेलु कामगार यांना त्या वर्षी १०,००० रुपये त्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहे. ( दरवर्षी ३१ डिसेंबर ला, जे घरेलु कामगार यांचे वयाची ५५ वर्ष पूर्ण होणार आहे ते या सन्मान धन योजनेला पात्र ठरणार आहे ). पण या साठी एक अट आहे की त्या घरेलु कामगारांची नोंद ही मंडळाकडे पाहिजे आणि ती नोंदणी सक्रिय पाहिजे.

सन्मान धन योजना घरेलु कामगार अटी व शर्ती Gharelu Kamgar Yojana Terms And Conditions :

१) ३१ डिसेंबर ला वयाची ५५ वर्ष पूर्ण झालेल्या घरेलु कामगार यांना याचा फायदा होणार आहे.

२) या सन्मान धन योजनेतून ३१ डिसेंबरला ५५ वर्ष पूर्ण झाल्यावर आणि नोंदणी ही सक्रिय असल्यावर च रक्कम मिळणार आहे.

३) नोंदणी सक्रिय असेल आणि वयाची वर्षी ही ५५ वर्ष पेक्षा जर असेल तर ही सन्मान धन योजना लागू होईल का ? , हो होईल फक्त या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नाही पाहिजे.

४) एकदा लाभ घेतला असेल तर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

५) नोंदणी ही सक्रिय पाहिजे. सक्रिय म्हणजे दरवर्षी नोंदणी ही मंडळाकडे कागदपत्रे जमा करून ती नोंदणी पुनर्जीवित केलेली पाहिजे.

FAQS. Sanman Dhan Yojana Maharashtra Gharelu kamgar

१) सन्मान धन योजना ही कोणत्या कामगारांसाठी आहे ?

Answer : सन्मान धन योजना ही जे घरेलु कामगार आहेत त्यासाठी आहे.घरेलु कामगार म्हणजे जे इतरांच्या घरात भांडी घासणे, झाडू मारणे, फरची पुसणे, स्वयंपाक करणे, मुलांकडे लक्ष देणे आधी सर्व काम करतात ते सर्व घरेलु कामगार मध्ये येतात.

२) सन्मान धन योजना मधून किती रक्कम ही घरेलु कामगारांसाठी मिळत आहे ?

Answer : जे घरेलु कामगार आहेत, ज्या घरेलु कामगारांनी वयाची ५५ वर्ष पूर्ण केले आहेत, आणि घरेलु कल्याणकारी कामगार मंडळ यांकडे नोंदणी सक्रिय केलेली आहे ते सर्व घरेलु कामगार या योजने साठी पात्र ठरतात.


Leave a Comment