गाय गोठा बांधण्यास 78 हजार रुपये अनुदान | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र |Gai Gotha Anudan Yojana Maharashtra | Cowshed Subsidy Anudan Maharashtra |

Gai Gotha Anudan Maharashtra : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक योजना आणत असते. काही 50% सबसिडीवर आहेत, काही 100% सबसिडी किंवा अनुदानावर या योजना असतात. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन संदर्भात अनेक विविध योजना आणत असते. यामध्ये पाहिले की शेळी अनुदान योजना, गाय अनुदान योजना, गाय गोठा अनुदान योजना, शेळी निवारा योजना, कंपोस्ट खत योजना आदी योजना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी आणत असते.

पशु संदर्भात जर पाहिलं पावसाळ्यामध्ये पशु साठी जर निवारा नसेल तर ते पशु दगावण्याची शक्यता असते. म्हणून महाराष्ट्र शासन ज्या शेतकऱ्यांना पशु साठी निवारा करण्यासाठी पैसे नसेल तर महाराष्ट्र शासन पशुंसाठी निवाराची सोय करून देत आहे.

आपण आज महाराष्ट्र शासनामार्फत पशु साठी निवाराची सोय व्हावी म्हणून गाय गोठा अनुदान योजना जाहीर केलेले आहे याला दुसरे एक नाव आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. तुमच्या घरामध्ये जर काही असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

जर पशु साठी निवाराची सोय झाली तर पशूंना म्हणजे गाई शेळ्या म्हैस किंवा आधी पालतू जनावरे असतील तर त्यांना पावसाळ्यामध्ये तसेच हिवाळ्यामध्ये संभवता उन्हाळ्यामध्ये या ऋतूचक्राचा त्यांच्यावर जास्त प्रभाव होत नाही.

बऱ्याचदा असे होते की, जर निवाऱ्याची सोय नसेल किंवा चाऱ्याची सोय नसेल तर बऱ्याचदा शेतकरी किंवा पशुपालन करणारे हे स्थलांतरित करताना आपल्याला पाहायला भेटतात. या स्थलांतरामुळे एक मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिणाम होत असतो.

शासनाने ही बाब विचारात घेऊन त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी शेतकरी राहतो किंवा पशु पालन करणारे ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी त्यांना निवाऱ्याची सोय करून देणे यासंदर्भात शासन ही योजना काढलेली आहे. गाय गोठा अनुदान संदर्भात जर पाहिला आपण तर महाराष्ट्र शासन यासाठी 78 हजारापर्यंत कमीत कमी अनुदान देतात. तुमच्याकडे जर गाईंची संख्या जास्त असेल तर हे अनुदान डबल होते.

आहे त्या ठिकाणी जर हे गोठा किंवा निवारीची सोय केली तरी यामुळे स्थलांतर सुद्धा थांबते संभवता रोजगार सुद्धा उपलब्ध होतो म्हणून महाराष्ट्र शासनाने हे जे गाई गोठा अनुदान आहे ते मनरेगा मार्फत तयार करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. यामुळे तुम्हाला हाय त्या ठिकाणी रोजगार सुद्धा उपलब्ध होतो सोबत तुमचे गाई गोठा चे काम काम सुद्धा पूर्ण होते.

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र उद्देश Gai Gotha Anudan Yojana Maharashtra

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra : शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांमध्ये स्वयपूर्तता वाढवणे किंवा शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशाने योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना गाय गोठा तयार करून मिळते तसेच त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध होतो.

जर तुमच्या घरामध्ये शेळ्या असतील तर त्यासाठी सुद्धा अनुदान भेटत आहे. बहुतेक वेळा असं होतं की, आपला बळीराजा अर्थात शेतकरी गाय गोठा तयार करण्यासाठी किंवा शेळ्यांसाठी निवारा करण्यासाठी कर्ज घेण्याच्या तयारीत असतो. निवाऱ्याची सोय करण्यासाठी हे बहुतेक वेळा कर्ज घेतले जाते. यातून शेतकरी हा कर्जबाजारी होतो किंवा आर्थिक अडचणी मध्ये येत असतो.

या आर्थिक अडचणीतून काढण्यासाठी तसेच पशुंसाठी निवारा करण्यासाठी त्यांनी कुठे कर्ज घेऊ नये यासाठी मार शासनाने ही योजना काढलेली आहे. ही जी अनुदान आहे यातून पशूंसाठी निवाऱ्याची सोय नक्कीच होते. तसेच गोठा बांधताना त्याला एक रोजगार सुद्धा उपलब्ध होतो. त्यामुळे गाय गोठा अनुदान योजना अर्थात शरदचंद्र पवार ग्राम समृद्धी योजना ही एक यशस्वी योजना ठरलेली आहे.

गाई गोठा अनुदान योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये Gai Gotha Anudan Yojana Maharashtra Important Fact

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra : गाई गोठा अनुदान योजना महाराष्ट्र किंवा शरदचंद्र पवार ग्राम समृद्धी योजना ( ही योजना अनेक योजनांचा बंद आहे ). या योजनेचे वैशिष्ट्ये जर पाहिले आपण तर या योजनेमार्फत शेतकऱ्यांना नक्कीच पैसे भेटतात त्यामुळे ही योजना शंभर टक्के खरी आहे या संदर्भात आपण काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये खाली पाहू.

 • ही योजना शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालन करणाऱ्यांसाठी आहे.
 • या योजनेचा लाभ सरळ शेतकऱ्यांना भेटतो.
 • या योजनेसाठी वशिल्याबाजी चालत नाही.
 • अर्ज केल्यानंतर तुम्हाला ती नक्कीच भेटते.
 • या योजनेचे लाभ तुम्हाला मनरेगा मार्फत काम केल्याने भेटतो.
 • या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना किंवा पशुपालन करणाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवले जातात यामध्ये कोणताही व्यक्ती मध्यस्थी नसतो.

गाई गोठा अनुदान योजना महाराष्ट्र अनुदान Gai Gotha Anudan Yojana Maharashtra

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra : शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासन गाई गोठा बांधण्यासाठी कमीत कमी 78000 अनुदान देते ( ~ 77188 Rs ). 78 अनुदान घेण्यासाठी तुम्हाला किमान दोन ते सहा गाई तुमच्याकडे पाहिजे.

जर तुमच्याकडे सहा पेक्षा जास्त गाई ची संख्या असेल तर तुम्हाला हे अनुदान 78 हजार च्या दुप्पट भेटते. जर तुमच्याकडे गाईंची संख्या याच्या पेक्षाही जास्त असेल तर तुम्हाला याच्या पट गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. उदाहरणार्थ तुमच्याकडे जर 12 पेक्षा जास्त गाईंची संख्या असेल तर ते अनुदान तुम्हाला 3 पट दिले जाते.

👉👉👉गाई गोठा अनुदान योजना महाराष्ट्र संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈👈

गाई गोठा अनुदान योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे Gai Gotha Anudan Yojana Maharashtra Important Document

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra : गाई गोठा अनुदान घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे ती यादी खालील प्रमाणे.

 • आधार कार्ड पाहिजे
 • महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
 • रेशन कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो.
 • ज्या ठिकाणी बांधायचा आहे त्या ठिकाणचा अक्षांश आणि रेखांश चा मोकळे जागेचा फोटो
 • अर्ज
 • रहिवासी दाखला , रहिवासी स्वयं घोषणापत्र सुद्धा या ठिकाणी चालेल.
 • जातीचे असाल तर जातीचा दाखला.
 • अर्ज करणार व्यक्ती शेतकरी असायला हवा किंवा पशुपालन करणारा असावा. ज्या ठिकाणी बांधायचे ते त्याला आराखडा त्यांच्याक घोषणापत्रडे असावा.
 • पशु वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला.
 • ग्रामसेवक यांचा दाखला
 • स्वयंरोजगार सेवक यांचा दाखला.

या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट असा आहे की, हे अनुदान घेताना यापूर्वी कोठेही या संदर्भात अनुदान घेतलेले नसावे. यासाठी तुम्हाला वेगवेगळे संबंध एकत्र या ठिकाणी द्यावे लागतील.

gai gotha anudan maharashtra
gai gotha anudan maharashtra

गाई गोठा अनुदान योजना महाराष्ट्र अर्ज करण्याची प्रक्रिया Gai Gotha Anudan Yojana Maharashtra Application

Gai Gotha Anudan Yojana Maharashtra : तुम्हाला जर गाय गोठा अनुदान योजना मिळवायची असेल, अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तेथील ग्रामपंचायत मध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ग्रामसेवक यांच्याशी गाय गोठा अनुदान संदर्भात चर्चा करायची आहे. त्यानंतर ग्रामसेवक यांना सांगायचे आहे की मला गाई गोठा अनुदान मिळवायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल. ते तुम्हाला अर्ज करण्यास सांगतील.

गाय गोठा अनुदान योजना हा अर्ज तुम्हाला तुमच्याच ग्रामपंचायत मध्ये मिळेल. तेथेच बसून तुम्ही तो अर्ज तयार करायचा आहे. अर्ज तयार केल्यानंतर त्याच्यासोबत इतर कागदपत्रे लागणार आहेत. याची यादी वर दिलेली आहे ( आवश्यक कागदपत्रे यामध्ये ). सोबत ज्या ठिकाणी बांधायचा आहे त्या ठिकाणचा आराखडा याचा फोटो तुम्हाला अर्ज सोबत जोडायचा आहे.

हा अर्ज दिल्यानंतर यामध्ये सर्वांच्या सह्या झाल्यानंतर ( जसे की ग्रामसेवक, तलाठी, ग्राम स्वयंरोजगार सेवक आणि पशु वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला घेतल्यानंतर ) हा अर्ज ग्रामसेवक यांच्याकडे जमा करायचा आहे.

ग्रामसेवक हा अर्ज घेऊन तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जमा करतील. काही दिवसानंतर तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जांची यादी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये पाहायला भेटेल. जर तुम्ही केलेला अर्ज, किंवा जर यादीमध्ये तुमचे नाव आले असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये एक तक्रार दाखल करून माहिती मिळू शकतात. पण असं होते की सर्वांचेच अर्ज याठिकाणी मंजूर होतात.


Leave a Comment