दाखले काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात पहा which document is need for All imp Certificate list check here

1. उत्पन्न दाखला

 1. तलाठी उत्पन्न दाखला –
  (मागणी नुसार/श्यक्यतो SC/ST – १ वर्ष व OBC/NT/SBC/ESBC – ३ वर्ष काढावा)
 2. रेशनकार्ड झेरॉक्स.
 3. उत्पन्न नोकरीपासुन असल्यास आय टी रिटर्न अथवा वेतन प्रमाणपत्र इतर व्यक्तींना आवश्यक नाही.

2. वय व अधिवास (Domecile)

 1. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड(जन्मस्थळ आवश्यक)किंवा जन्म प्रमाणपत्र
 2. तलाठी रहिवासी किंवा ग्रामपंचायत रहिवासी किंवा पासपोर्ट साईज फोटो
 3. रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक)

वय व राष्ट्रीयत्व ( Age And Nationality certificate)

 1. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड (जन्मस्थळ आवश्यक) किंवा जन्म प्रमाणपत्र
 2. तलाठी रहिवासी किंवा ग्रामपंचायत रहिवासी किंवा पासपोर्ट साईज फोटो.
 3. रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक ).
 4. वय व अधिवास(Domecile)प्रमाणपत्र

which document is need for All imp Certificate list check here
which document is need for All imp Certificate list check here

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र ( Non Crimilayar )

 1. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड (जन्मस्थळ आवश्यक) किंवा जन्म प्रमाणपत्र.
 2. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत
 3. रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक)
 4. तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्न दाखला(उत्पन्न मर्यादा वार्षिक उत्पन्न 8 लाख च्या आत)

ई केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे येणारे 12 हजार रुपये होणार बंद 

डोंगरी दाखला

 1. मराठी शाळेचा रजीष्टर नंबर १ चा दाखला/उतारा
 2. तलाठी रहिवासी किंवा ग्रामपंचायत रहिवासी किंवा पासपोर्ट साईज फोटो.
 3. रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक)

अल्प भूधारक दाखला/शेतकरी दाखला

 1. जमिनीचा ८ अ उतारा व त्याप्रमाणे सर्व ७/१२ उतारे नवीन काढलेले किंवा डिजिटल उतारे आता आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
 2. ज्या व्यक्तीच्या नावाने दाखला हवा आहे त्याचा शाळेचा दाखला किंवा बोनफाईड.
 3. रेशनकार्ड झेरॉक्स.
 4. मंडलाधिकारी(Circal) शेतकरी अथवा अल्पभूधारक असल्याचा चौकशी अहवाल(त्याची प्रत आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे).
 5. अल्पभूधारक/शेतकरी असल्याचे स्वघोषनापत्र(त्याची प्रत आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे)

झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन अर्ज, 100% अनुदान अर्ज सुरू

जात प्रमाणपत्र (Cast Certificate)

 1. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड(जन्मस्थळ आवश्यक)किंवा जन्म प्रमाणपत्र.
 2. वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
 3. आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्म नोंद दाखला.
 4. अनुसूचित जाती/जमाती (SC/ST)सन १९५० पूर्वीचा पुरावा आवश्यक)
  विमुक्त जाती/भटक्या जमाती सन १९६१ पूर्वीचा पुरावा आवश्यक
  इतर मागास प्रवर्ग सन १९६७ पूर्वीचा पुरावा आवश्यक
  शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग(मराठा आरक्षण)सन १९६७ पूर्वीचा पुरावा आवश्यक. आजोबांचा दाखला नसल्यास चुलत आजोबा यांचा पण चालेल किंवा महसुली पुराव्यात जुळणारे नातेसंबंधातील दाखला)
 5. पणजोबांचा दाखला(आवश्यक असल्यास)
 6. वंशावळ स्वघोषनापत्र(त्याची प्रत आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे)

शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे

 1. ज्या व्यक्तीचे नाव समाविष्ट करायचे आहे त्या व्यक्तीचा जन्माचा दाखला किंवा बोनफाईड.
 2. सुनेचे नाव टाकायचे असल्यास माहेरील शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याचे दाखला.
 3. आधार कार्ड.
 4. ज्या शिधपात्रिकेत नाव टाकायचे आहे ती मूळ (ओरिजनल)शिधापत्रिका

शिधापात्रिकेत नाव कमी करणे

 1. मुलीचे लग्न झालेले असल्यास तिचा शिधापत्रिकेतून तलाठी यांनी दिलेला नाव कमी केल्याचा दाखला.
 2. ज्या शिधापत्रिकेतून नाव कमी करायचे आहे ति ओरिजनल शिधापत्रिका.
 3. आधार कार्ड झेरॉक्स.

EWS आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गात मोडत असल्याचे प्रमाणपत्र

 1. ज्या मुलाचा/मुलीचा ज्याच्या नावाने दाखला हवा आहे त्याचा शाळेचा दाखला झेरॉक्स.
 2. वडिलांचा शाळेचा दाखला झेरॉक्स.
 3. आजोबांचा शाळेचा दाखला झेरॉक्स.
 4. मा तहसीलदार यांचा ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
 5. रु १०० चा स्टॅम्प पेपर.
 6. रेशनकार्ड झेरॉक्स.
 7. मुलाचा/मुलीचा व वडिलांचा प्रत्येकी १ फोटो.

नवीन आधार कार्ड काढणेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. ओळखीच्या पुराव्यासाठी – ( खालीलपैकी कोणताही १ ) ( १) मतदान कार्ड
  २) पॅन कार्ड
  ३) पासपोर्ट
  ४) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक(फोटो व शिक्का आवश्यक)
 2. पत्त्याच्या पुराव्यासाठी – (खालीलपैकी कोणतेही १) ( १) मतदान कार्ड
  २) रेशनकार्ड
  ३) पासपोर्ट
  ४) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक(फोटो व शिक्का आवश्यक).

जन्म तारखेत बदल करण्यासाठी

 1. जन्माचा दाखला ओरिजनल
 2. आधार कार्ड बायोमेट्रिक/मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी
 3. आधार कार्ड व स्वतः व्यक्ती

पॅन कार्ड

 1. आधार कार्ड अपडेट असल्यास फक्त आधार कार्ड व त्या मोबाईल ला लिंक असलेला मोबाईल.
 2. आधार अपडेट नसल्यास २ फोटो आधार कार्ड (आधार कार्ड वर पूर्ण जन्म तारीख आवश्यक)

( पॅन कार्ड दुरुस्ती नाव/जन्म तारीख – ( आधार कार्ड पूर्णपणे अपडेट पाहिजे. ))

Leave a Comment