आला जीआर बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक देणार नोंदणी प्रमाणपत्र gramsevak bandhkam kamgar Nondani GR

आला जीआर बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक देणार नोंदणी प्रमाणपत्र gramsevak bandhkam kamgar Nondani GR

 

शासन परिपत्रक दिनांक 22 सप्टेंबर 2017 नुसार प्रत्येक ग्रामसेवक यास बांधकाम कामगार व इतर कामगार यांना ग्राम स्तरावर नोंदणी तसेच नोंदणी प्रमाण पत्रावर सही करण्यास बांधील करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे ग्राम सेवक असतील तसेच स्थानिक संस्थानी हे नोंदणी करावी किंवा नोंदणी प्रमाण पत्रावर सही करण्यास करण्यास सांगितले आहे, परंतु ही नोंदणी करताना काही अटी टाकलेल्या आहेत ती माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

सुरुवातीला ही नोंदणी करताना प्रमाण पत्रावर 90 दिवस काम केल्याचा उल्लेख केलेला नव्हता, त्यामुळे अनेक अपात्र लाभार्थी यांनी याचा फायदा घेतलेला आहे असे आढळून आले होते. तर या त्रुटी मध्ये बदल करून आता 22 सप्टेंबर 2017 च्या जीआर नुसार ज्या बांधकाम कामगार तसेच इतर कामगार यांनी कमीतकमी 90 दिवस काम केले आहे त्या सर्व बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक यांनी दाखले द्यावे असे सूचित केले आहे ( नमुना 90 दिवस काम केल्याचा दाखला या जीआर मध्ये page no. 3 मध्ये आहे.

शासन परिपत्रक : ग्रामसेवक यांनी कामगारांना दयायचे प्रमाणपत्र

१. जो कामगार असेल त्यांना हे प्रमाण पत्र द्यावे तसेच त्या कामगाराने ९० दिवस काम केलेले आहे याची खात्री करावी.

२. प्रमाण पत्र देताना त्याची वास्तव्याची खात्री करावी. अधिकृत वास्तव्याचा पुरावा पहावा.

३. प्रमाण पत्र देताना कामगाराचे ओळखपत्र पाहावे ( फोटो असलेला अधिकृत ओळखपत्र पाहावे ) ( उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ).

 

bandhkam kamgar gramsevak nondani pramanpatra

 

ग्रामसेवक यांना प्रमाण पत्र द्यावे हा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment