Maharashtra Birth certificate Document जन्माचा दाखला बनवण्यासाठी हे कागद पत्रे तुम्हाला दयावे लागतील.

जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील जन्म दाखला बनवण्याचा विचार करत असाल , तर त्या साठी कोणत्या कागद पत्रांची आवश्यकता भासेल तसेच कोणते कागद पत्रे तुमच्या कडे पाहिजे तरच तुम्हाला हा जन्म दाखला ( Birth Certificate ) काढता येईल या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. या माहिती द्वारे तुम्ही कोणाचेही जन्म दाखला बनवू शकता.

जन्म दाखला ( Birth certificate ) एक सरकारी दस्तावेज आहे. या जन्म दाखल्या मध्ये तुमचे नाव , जन्म दिनांक , वडिलांचे नाव , जन्म ठिकाण, तसेच तुमचा पत्ता या संदर्भात गोपनीय माहिती असते.

या गोपनीय माहितीचा वापर तुम्ही आधार कार्ड तयार करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे, विवाह नोंद करणे, वोटिंग साठी, रोजगार मिळवण्यासाठी नोंदणी करता तसेच पेन्शन करता इत्यादी , सर्व शासकीय तसेच निमशासकीय कामासाठी व योजनांसाठी हा जन्म दाखला ( Birth certificate ) महत्वाचे आहे.

हि माहिती पहा : नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान अंतर्गत सर्व गावे विकसित करण्याबाबत

जन्म दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

जर तुम्हाला जन्म दाखला मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला खालील महत्वपूर्ण कागद पत्रांची आवश्यकता भासेल. खालील कागद पत्रे तुम्ही तयार ठेवा.

1. ओळखीचा पुरावा

2. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

3. रेशन कार्ड ( Reshan card )

4. पासपोर्ट फोटो

5. जर जन्म हा हॉस्पिटल मध्ये किंवा दवाखान्यात झाला असेल तर तेथील प्रमाण पत्र

6. जर जन्म हॉस्पिटल मध्ये झाला नसेल तर जन्म नोंद दाखला.

हि माहिती पहाशासन आपल्या दारी या उपक्रमाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद, तुम्हीही मिळवा लाभ, असा करा अर्ज

जन्म दाखला मिळवण्यासाठी अर्ज कसा करणार :

  1. सर्वात आधी तुम्ही भारत सरकार ची वेबसाईट www indian gov in यावर जायचे आहे.

2. या वेबसाईटवर गेल्यानंतर Search madhye Birth certificate Maharashtra असे Search करायचे आहे.

3. Search केल्यानंतर तुम्हाला काही लिंक दिसतील ज्या फक्त सरकारी लिंक असतील तेथे ‘ Apply for Birth Certificate Maharashtra ‘ असे दिसेल तेथे क्लीक करा

4. क्लीक केल्यानंतर ते नवीन page वर नेतील पुन्हा आता ‘ Apply for Birth Certificate Maharashtra ‘ यावर क्लीक करायचे आहे . क्लीक केल्यानंतर तुम्ही ‘आपले सरकार सेवा केंद्र ‘ येथे ‘ जन्म प्रमाण पत्र ( Birth certificate ) या ठिकाणी याल.

5. सुरुवातीला आपले सरकार मध्ये acount बनवून घ्या आणि फक्त मोबाईल नंबर वरून तुमचे खाते ( account ) तयार होईल .

6. खाते तयार झाल्यानंतर तुम्ही birth certificate हा Option घेऊन हा digital जन्म दाखला फक्त 5 च दिवसात मिळवू शकता.

Leave a Comment