नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान अंतर्गत सर्व गावे विकसित करण्याबाबत Namo Atmanirbhar Abhiyan

 

Namo Atmanirbhar And Saur Urjaa Gaon Abhiyan :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसा निमीत्त किंवा वाढ दिवसाचे औतीच्य साधून नमो 11 – सूत्री कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यात राबविणार आहे. यामध्ये विविध अभियान आणि योजना सुद्धा आहेत. ( ex – नमो शेततळे योजना ). महाराष्ट्र शासनाने या 11 सूत्री कार्यक्रम पैकी आता राज्यात ‘नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान ‘ Namo Atmanirbhar And Saur Urjaa Gaon Abhiyan राबवून महाराष्ट्रातील गावे ही विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

या ‘नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान ‘ अंतर्गत गावे विकसित करण्या संदर्भात या अभियांची ध्येय ठरवणे तसेच यासाठी ठरवलेली उद्दीष्टे साध्य करणे यासाठी रूपरेषा सरकारने निश्चित केली आहे.

 

महात्मा गांधीजी हाक खेड्याकडे चला :

खरा भारत पाहायचा असेल तर ‘ खेड्याकडे चला ‘ अशी सर्वांना हाक महात्मा गांधीजी यांनी दिली होती. या ‘ खेड्याकडे चला ‘ मध्ये आशय हा होता की, खेड्या गावांचे सक्षमीकरण करणे, आत्मनिर्भर बनवणे. या अभियानांतर्गत आता हाच ‘ खेड्याकडे चला ‘ गुरुमंत्र घेऊन महाराष्ट्र शासन नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसाचे औतिच्य साधून खेड्या गावांचे ‘ आर्थिक विकास करणे, सामाजिक व भौतिक विकास करणे, यामध्ये सौर ऊर्जा गाव अभियान राबवून 73 अश्या पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.

सदर ‘नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान ‘ Namo Atmanirbhar And Saur Urjaa Gaon Abhiyan अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात यामध्ये दोन गावांची निवड करून तसेच विभागीय मुख्यालय असलेल्या जिल्ह्यात यामध्ये ‘ तीन ‘ गावे निवडण्यात येणार आहे. तसेच या निवड केलेल्या गावांना ‘ ग्रामस्वच्छता अभियान तसेच स्मार्ट ग्राम अभियान किंवा बक्षीस पात्र गावांची यात निवड होणार आहे.

 

हे पण पहातुमच्या गावची मतदान यादी जाहीर Voter List Dawnload Maharashtra, तत्काळ यादीत नाव पहा

 

नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान समिती :

 

सदर अभियान करताना प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती घटित करण्यात येईल. या समिती मार्फत Namo Atmanirbhar And Saur Urjaa Gaon Abhiyan त्याचा गावांचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येईल. या समिती मध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य असतील तसेच संबंध जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणेचे प्रमुख हे सदस्य असतील.

 

नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान उद्दीष्टे  Namo Atmanirbhar And Saur Urjaa Gaon Abhiyan Objectives  :

 

1. गावाचा विकास करताना बेघर असतील त्यांना त्यांना घरे, तसेच कच्चे घरे असतील तर राहण्यासाठी पक्के घरे बांधणे.

2. घरापाशी शौचालय बांधून त्याच्या वापरास प्रयत्न करण्यास लावणे.

3.तेथील कच्चे रस्त्याचे पक्के रस्ते बनवणे तसेच पक्क्या रस्त्याचे जाळे उभारणे.

4.गरजू लोकांना त्याच गावात रोजगार मिळवणे.

5. शेती तसेच शेतीला पूरक व्यवसायातून किंवा त्या माध्यमातून आर्थिक विकास साधणे.

6. सेंद्रिय शेती साठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

7. दारिद्र्य रेषे खाली असणाऱ्या कुटुंबाना आर्थिक दृष्ट्या तयार करणे तसेच सक्षम करणे.

8. पाण्याबाबत ते गावे पूर्णपणे स्वावलंबी करणे.

9. सौर आणि हरित ऊर्जेचा वापर करणे.

10. यशस्वी तसेच प्रगत शील असणारे शेतकरी यांचा यथोचित गौरव करणे हे या अभियानातून साध्य करणार आहेत

 

जीआर पहा – नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान अंतर्गत सर्व गावे विकसित करण्याबाबत

 

 


Leave a Comment