आला जीआर बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक देणार नोंदणी प्रमाणपत्र gramsevak bandhkam kamgar Nondani GR
शासन परिपत्रक दिनांक 22 सप्टेंबर 2017 नुसार प्रत्येक ग्रामसेवक यास बांधकाम कामगार व इतर कामगार यांना ग्राम स्तरावर नोंदणी तसेच नोंदणी प्रमाण पत्रावर सही करण्यास बांधील करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे ग्राम सेवक असतील तसेच स्थानिक संस्थानी हे नोंदणी करावी किंवा नोंदणी प्रमाण पत्रावर सही करण्यास करण्यास सांगितले आहे, परंतु ही नोंदणी करताना काही अटी टाकलेल्या आहेत ती माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
शासन परिपत्रक : ग्रामसेवक यांनी कामगारांना दयायचे प्रमाणपत्र
१. जो कामगार असेल त्यांना हे प्रमाण पत्र द्यावे तसेच त्या कामगाराने ९० दिवस काम केलेले आहे याची खात्री करावी.
२. प्रमाण पत्र देताना त्याची वास्तव्याची खात्री करावी. अधिकृत वास्तव्याचा पुरावा पहावा.
३. प्रमाण पत्र देताना कामगाराचे ओळखपत्र पाहावे ( फोटो असलेला अधिकृत ओळखपत्र पाहावे ) ( उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी ).
ग्रामसेवक यांना प्रमाण पत्र द्यावे हा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा