श्री राम जन्म भूमी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 6 वस्तु मिळणार आनंदचा शिधा

 

Anandacha Shidha Vatap 2024 : नमस्कार. श्री राम जन्म भूमी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 6 वस्तु मिळणार आहे हे सर्व आनंदचा शिधा याद्वारे दिले जाणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत 10 जानेवारी 2024 रोजी निर्णय झालेला आहे. या आनंदाच्या शिधा मध्ये काय वाटप केले जाणार आहे या संदर्भात माहिती पाहू.

10 जानेवारी 2024 रोजीच्या मंत्री मंडळ बैठकीत अनेक निर्णय झाले त्या पैकी एक म्हणजे श्री राम जन्म भूमी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित आनंदाचा शिधा वाटप ! हा आनंदाचा शिधा २२ जानेवारी 2024 पासून सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. या वाटपा मध्ये प्रमुख 6 वस्तु असणार आहे. या संदर्भात माहिती पाहू.

Anandacha Shidha Maharashtra goverment
Anandacha Shidha Maharashtra goverment

 

Anandacha Shidha Vatap 2024 : या वस्तु मध्ये चनाडाळ, रवा, साखर, खाद्यतेल,मैदा आणि पोहे असे ऐकून 6 वस्तु असणार आहे. राज्यातील ऐकून 1.68 कोटी रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. याचे वाटप 22 जानेवारी 2024 पासून होणार आहे.

कोणाला मिळणार हा आनंदाचा शिधा !

राज्यातील अंत्योदय अंन योजना कुटुंबे, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच इतर APL धारक या भागातील ( अमरावती विभागातील सर्व जिल्हे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नागपूर विभाग वर्धा ). या भागात आनंदाचा शिधा दिले जाणार आहे.

Anandacha Shidha Vatap 2024  : या आनंदाचा शिधा वाटप साठी शासनाला 549.86 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे त्यामुळे या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. हा जर आनंदाचा शिधा मिळवायचा असेल तर तुम्हाला 100 रुपये द्यावे लागणार आहे.

 

Leave a Comment