शासन आपल्या दारी या उपक्रमाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद, तुम्हीही मिळवा लाभ, असा करा अर्ज
महाराष्ट्र शासना मार्फत लोककल्याणकारी राज्य व्यवस्थे साठी अनेक योजना काढल्या जात आहेत, पण या योजना खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही किंवा त्यांच्या पर्यंत पोहचत नाही. जर एखाद्या लाभार्थ्यांला योजना मिळवायची असेल तर त्या लाभार्थ्यांला शासकीय कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करणे, पाठपुरावा करणे यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो. शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर लाचखोरी ही एक भीषण समस्या त्या लाभार्थी समोर जाणवत असते. ( एवढे पैसे द्या काम करून देतो). अश्या कारणामुळे लाभार्थी ती योजना घेण्याचे टाळतो. सोबत जर लाभार्थी यांनी लाचखोरीला विरोध केला तर त्या लाभार्थ्यांला अनेक अनुउत्तरीत उत्तरे दिले जातात. ( सध्या योजना चालू नाही, योजना बंद झाली, आज मीटिंग आहे उद्या या अश्या वेगवेगळ्या उत्तरात वारंवार चकरा मारायला मारायला लावतात.) या वारंवार चकरा मारायला लावत असल्यामुळे लाभार्थी ती योजनाच सोडून देतो.
लोक कल्याण चे ध्येय समोर ठेऊन महाराष्ट्र सरकारने विशेषतः शिंदे सरकारने सर्व सरकारी योजना हे लाभार्थ्यांना कशी सहज आणि सुलभ पणे मिळेल याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी शिंदे सरकारने प्रत्येक जिल्ह्यात किमान 75,000 लाभार्थी लक्ष ठेऊन ” शासन आपल्या दारी, शासकीय योजनांची पंढरी ” हा अभिनव उपक्रम राबवून या लाभार्थ्यांना ह्या योजना मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
फक्त उपक्रम न काढता शिंदे सरकारने या योजना खर्या लाभार्थ्यान पर्यंत पोहचून सुद्धा दिल्या आहेत. नवीन आलेल्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्रात आतापर्यंत 1.68 कोटी लाभार्थ्यांनि या योजनेचा लाभ घेतला आहे ( ऑक्टोबर 2023 शेवट पर्यंत आकडेवारी).
महत्वाचे जिल्हे आणि लाभार्थी
जिल्हा आणि लाभार्थी संख्या ( ऑक्टोबर 2023 पर्यंत )
अहमदनगर – 24,48,269
पुणे – 22,61,787
नाशिक – 10,55,986
कोल्हापूर – 2,37,827
मुंबई शहर – 52,684
गडचिरोली – 6,97,000
नागपूर – 1,66,000
छत्रपती संभाजीनगर – 24,48,269
सातारा – 2,85,669
Itc.
हे पण पहा : शासन आपल्या दारी योजने संदर्भात अजून माहिती साठी येथे क्लीक करा
शासन आपल्या दारी या योजनेत सहभागी साठी शासनाने नवीन वेबसाईट सुरू केली आहे . या वेबसाईट मार्फत अर्ज मागितले आहेत
शासन आपल्या दारी या मार्फत अर्ज करण्यासाठी तसेच महालाभार्थी वेबसाईट वर अर्ज साठी येथे क्लीक करा