आधार ही जगातील सर्वात मोठी ओळख असणारी तसेच व्यक्ती पुरावा असणारी योजना आहे . भारताच्या केंद्रिय मंत्रालयात मार्फत ( इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ) नियंत्रित असणाऱ्या UDAI मार्फत हे आधार कार्ड दिले जाते. आतापर्यंत या आधार योजने मार्फत 1 अब्ज 30 कोटी लोकांचे आधार क्रमांक तयार केले आहे. आधार कार्ड भारतात ओळख पत्र म्हणून गृहीत धरले जाते
केंद्र सरकारने जाने 2009 मध्ये UDAI ची स्थापना केली त्यानंतर पाहिले आधार कार्ड हे 29 सप्टेंबर 2010 देऊन सुरुवात केली. असे म्हणता येईल की , आधार कार्ड ची सुरुवात ही 29 सप्टेंबर 2010 रोजी महाराष्ट्र मध्ये नंदुरबार जिल्ह्यात , शहादा तालुक्यामध्ये असणाऱ्या ” टेंम्भली ” या गावातील रहिवासी ‘ रंजना सोनवणे ‘ यांना पहिले आधार कार्ड तयार करून व देऊन झाली. या आधार कार्ड मध्ये एक युनिक 12 अंकी क्रमांक असतो त्याला आपण आधार क्रमांक सुद्धा म्हणतो. सुरुवातीला हा आधार क्रमांक फक्त ओळख पत्र व रहिवासी पुरावा म्हणून गृहीत धरला जायचा, परंतु कालांतराने या आधार कार्ड चा वापर सरकारने व्यक्तीची ओळख, पत्ता पुरावा , जन्म पुरावा, बँक व्यवहारासाठी, बँकेतील खाती उघडणे, पासपोर्ट उघडणे, मोबाईल सीमकार्डस, पी एफ, सार्वजनिक सर्व कामाकरिता सर्रास या आधार कार्ड चा वापर होत आहे. त्यामुळे आधार एक दैनंदिन जीवनाचा एक भागच होऊन गेला आहे ( अपवाद फक्त नागरिकत्वाचा पुरावा, नागरिकत्व हे संविधानात असणाऱ्या अटीवर दिले जाते. भारतात पहिल्यापासून असणाऱ्यांना जन्म जात नागरिकत्व मिळते.)
मध्यंतरी आधार कार्ड संदर्भात अनेक बोगस कारनामे बाहेर येऊ लागले होते. 2016 साली नाशिक मध्ये उपजिल्हाधिकारी यांनी अनेक छापे मारून बोगस आधार केंद्र बंद केली होती. याठिकाणी ‘ विशाल गड लिंग यांचे असणारे नेटवर्क पीपल्स सर्व्हिसेस मध्ये खाजगी ( नॉन स्टेट रजिस्टर ) मशीन मार्फत आधार कार्ड काढण्याचे , बदल करण्याचे काम जोरात चालू होते यामध्ये प्रत्यकी 100 रुपये ( 2016 साली ) घेऊन नोंदणी केली जात होती. तेथील नागरिकांच्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकारी यांनी दखल घेत ‘ ई डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मॅनेजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगून तक्रारीची चौकशी झाल्या नंतर तक्रारीमध्ये तथ्य सापडले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी सर्व जप्त करत या आधार केंद्र चालकावर गुन्हे दाखल केले.
अश्याच प्रकारचे अनेक कारवाई 2016 ते 2023 पर्यंत झाल्या आहेत.
अहमदनगर पारनेर मध्ये बोगस आधार केंद्रे आणि मन मर्जी फी :
अहमदनगर पारनेर मधील गोरेगाव – भाळवणी परिसरातील नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारीची दखल घेत चौकशी केली असता जे आधार केंद्र आहेत ते csc egov Bank BC तसेच MahaiT दिले आहे अशी माहिती मिळाली. ( काहींकडे याचा परवाना आहे की यात संभ्रम आहे . त्या संदर्भात माहिती केंद्रावर सापडत नाही तसा बोर्ड सुद्धा नाही ) असे प्राथमिक माहिती सापडले. Udai दिलेल्या निर्देशानुसार नवीन आधार काढणे फ्री मध्ये , मोबाईल नंबर आधार ला लिंक करणे यासाठी 50 रुपये ठेवले आहे आणि बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक अपडेट करणे यासाठी 100 रुपये चार्ज ठेवला आहे.
आधार चार्जेस संदर्भात माहिती साठी येथे क्लिक करा
अहमद नगर – गोरेगाव – पारनेर – भाळवणी परिसरात असणारे आधार केंद्र चालक या मार्फत नवीन आधार साठी सुद्धा चार्जेस लावत आहे, आधार मोबाईल लिंक यासाठी 200 रुपये आणि सर्व अपडेट जर करायचे असेल 300 ते 400 रुपये एवढ्या पर्यंत चार्जस लावत आहेत. नागरिकांची होणारी हेडसाळ लक्षात घेत नागरिक सुद्धा हे चार्ज देऊन टाकतात कारण दुसरे आधार केंद्र खूप लांब अंतरावर आहेत याचा फायदा हे आधार केंद्र चालक घेतात. या आधार केंद्र चालकांचे शिकार हे वयस्कर ( पेन्शन धारक / वयस्कर शेतकरी लोक मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या भागातील नागरिकांनी या आधार केंद्रावर ( गोरेगाव -भाळवणी – कान्हूर परिसर ) कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
या आधार केंद्र चालकांचे महा इसेवा केंद्र सुद्धा आहेत. या आधी सुद्धा या आधार केंद्र आणि महा इसेवा केंद्र ( गोरेगाव – भाळवणी परिसर ) 2018, 2019, 2020 मध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी सुद्धा तहसीलदार पारनेर यामार्फत समजवण्यात आले होते. ( 2019 मध्ये कर्ज माफी आलेली असताना केवायसी साठी 500 ते 1000 रुपये घेतल्याचे तक्रारी आल्या होत्या त्यावेळी या गोरेगाव – भाळवणी भागात असणाऱ्या महा इसेवा केंद्रा कारवाई झालेली होती. पी एम किसान नोंदणी साठी हजारो रुपये घेतल्याचे निदर्शनात त्यावेळी आले होते.
या केंद्रात मार्फत दाखले सुद्धा काढण्यासाठी विविध चार्जेस रेट आहेत
१. उत्पन्न दाखला साठी 150 ते 180 रुपये
२. रहिवासी साठी 150 ते 200 रुपये,
३. जात प्रमाण पत्र काढण्यासाठी 800 ते 1500 रुपये,
4. कुणबी जातीचा जर दाखला काढायचे असेल तर व्यक्ती बघून विविध चार्जेस लावले जातात. आमची ( SDO पारनेर श्रीगोंदा ) ला ओळख आहे. दाखला लगेच काढतो असे सांगून जास्तीत जास्त वाजवी रक्कम ते घेतात. यासाठी फक्त 35 रुपये लागत असतांना साहेबांना द्यावे लागतात या नावा खाली 10,000 रुपये ते 20,000 रुपये एवढी रक्कम घेतली जाते. शेतकरी आपला दाखला निघत असल्यामुळे कोणतीही तक्रार न करता यांना कोणाकडून तरी उसने वारी करत किंवा कर्ज काढत ही रक्कम त्याना देऊन टाकतात ( मुळात हा खर्च 35 रुपये असतांना एवढी मोठी रक्कम हे मुददामून घेत असतात. )
गोरेगाव – भाळवणी शिवारात असणाऱ्या आधार केंद्रांवर कारवाईची मागणी
नागरिक या गोरेगाव – भाळवणी शिवारात असणाऱ्या आधार केंद्र आणि महा इसेवा केंद्र याना वैतागलेले आहेत. तक्रारी केली असता यांविरुद्ध कोणतीच कारवाई होत नाही. यामुळे हे अधिकारी वर्ग यांच्याशी जोडलेले आहेत का अशी चर्चा या परिसरात होत आहे. या केंद्रा विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी सर्व ठिकाणी हे नागरिक साकडे घालत आहे.