आली बातमी ! नमो शेतकरी चा पहिला हप्ता या 26 ऑक्टोबरला Namo Shetkari First Installment
महाराष्ट्र शासनाने अखेर या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या साठी मुहूर्त काढलेला आहे , या संदर्भात आपण माहिती पाहू. यामध्ये येणारा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या संदर्भात माहिती दिली आहे.
1. नमो शेतकरी चे एवढे पैसे भेटणार Namo Shetkari First Installment
महाराष्ट्र सरकारने पी एम किसान Pm Kisaan Yojana योजनेच्या धर्तीवर 6 हजार वार्षिक प्रमाणे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाढीव आणखी 6 हजार रुपये देण्याच्या तयारीत महाराष्ट्र शासन होते. यामुळे शेतकऱ्यांना वर्षीक पी एम किसान चे 6 हजार रुपये आणि आणि महाराष्ट्र शासनाचे 6 हजार असे ऐकून 12 हजार रुपये मिळतील. यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये बजेट भाषणात याची घोषणा केली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांला वार्षिक 6 हजार रुपये दिले जाणार आहे.
2. नमो शेतकरी च्या पहिला हप्ता ला उशीर का झाला Namo Shetkari First Installment
फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या 8 महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण जीआर काढले तसेच या कालावधीत शेतकऱ्याच्या नोंदी केल्या, सोप्या शब्दात संपूर्ण कामाचे module त्यांना दिले होते. त्यांच्याकडून कामामध्ये उशीर झाला त्यामुळे सरकारने पहिला हप्ता जारी करण्याचा ठरवला. तसेच कृषी विभागाकडून फेर पडताळणी साठी सुद्धा उशीर झाला होता.
3. नमो शेतकरी चा पहिला हप्ता मुहूर्त या तारखेला Namo Shetkari First Installment
महाराष्ट्र शासनाने दिवाळी पूर्व ” दशहरा ” ला हा मुहूर्त काढला, दशरा झाल्यावर 2- 3 दिवसात हे पैसे पात्र शेतकऱ्याच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यावर Namo Shetkari Fund Transfer Adhar link Bank Acount जमा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासना मार्फत शेतकऱ्यांना आहावन करण्यात आले की पात्र शेतकऱ्यांनी त्याचे बँक खाते आधार शी लिंक करावे किंवा आधार कार्ड ला बँक लिंक करावे. येत्या 26 ऑक्टोबर 2023 ला म्हणजे गुरुवारी ह पैसे शिर्डी येथून एका कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत हे वितरित केले जाणार आहे या कार्यक्रमात मंत्रिमंडळ याची हजेरी असणार आहे.
4. नमो शेतकरी चे सर्वाधिक लाभार्थी कोठून आहेत Namo Shetkari First Installment
नमो शेतकरी साठी सर्वाधिक लाभार्थी हे नगर मधून आहेत, त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर,पुणे आणि ठाणे असा क्रम आहे, नगर मधून लाभार्थी संख्याही 5 लाख, 17 हजार, 610 आहे. पैसे विचारण्याचे काम बँके कडे दिले आहे. बँके कडे सरकार कढुन पैसे हे सोमवारी पाठवले जाणार आहे ( प्रत्येक बँके कडे ) आणि ते गुरुवारी 26 ऑक्टोबर 2023 ला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.