नमस्कार मंडळी नुकतेच महाराष्ट्र शासनाने जे बांधकाम कामगार व इतर कामगार आहेत ज्यांची महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली आहे त्यासाठी गृह उपयोगी साहित्य संच ( ३० नग ) अर्थात भांडी वाटप ही योजना सुरू करण्यात आलेली होती.
प्रत्येक जिल्ह्यात जर पाहिले तर नोंदणी केलेले सरासरी जवळपास १ – २ लाख पर्यंत नोंदणी कृत कामगार आहेत आणि जीवित बांधकाम जवळ प्रत्येक जिल्ह्यात ६० हजार ते ७० हजार पर्यंत आहेत यामध्ये जीवित कामगारांची संख्या वाढत आहे आणि भांडी घेण्यासाठी जरी कुटुंबातून एकाला असेल तरी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
बांधकाम कामगार भांडी वाटप योजना Maharashtra Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana :
त्यामुळे जवळजवळ ऐकून कामगारांच्या फक्त 10 -12 % बांधकाम कामगारांना हे भांडे मिळाले आहे. हे भांडे कसे मिळाले असतील हे तुम्हाला माहीतच असेल मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अतिरिक्त चार्जेस थर्ड पार्टीकडून घेऊन हे भांडे मिळाले असेलच.असो,
नुकतेच महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाने सांगितले आहे की भांडी वाटप सध्या बंद ठेवणार आहे कारण ही तसेच आहे लोकसभा पंचवार्षिक निवडणूक आणि चालू असणारी आचार संहिता. यामुळे सरकारी योजना कोणतेही काहीही वाटप असेल तर ते या आचार संहिता काळात सर्व बंद करावे लागतात ( निवडणूक आयोग निर्देश ).
आता हे लोकसभा निवडणूक संपल्यावर आणि आचार संहिता संपल्यावर ही भांडी वाटप परत सुरू होणार आहे. त्यामुळे जे उर्वरित 88% -90 % कामगार यांना जे भांडे भेटायचे आहे त्या सर्व कामगारांना हे भांडे मिळणार आहे. भांडी मिळण्याबाबत तुम्ही जिल्हा कामगार सेतू केंद्र ( ऑफिस ) या ठिकाणी चौकशी करू शकता किंवा कामगार आयुक्त कार्यालय यांच्याकडे विनंती करू शकता.
📝 हे पण पहा : लखपती दीदी योजना 2024 अर्थसंकल्पात उल्लेख झालेली योजना, 3 कोटी महिला लखपती होणार पहा सविस्तर मध्ये
भांडी मिळवण्यासाठी आवश्यक कागद पत्रे Important Document Bandhkam Kamgar Bhandi Yojana :
१) कामगार कार्ड.
२) १ रुपयाची पावती.
३) आधार कार्ड .
४) रेशन कार्ड .
५) फॉर्म .
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Important Document new Registration Bandhkam Kamgar Yojana :
१) आधार कार्ड स्वत:चे आणि कुटुंबातील सदस्याचे .
२) ९० दिवस काम केले आहे प्रमाणपत्र ( ग्रामसेवक ( ग्रामपंचायत ) याचे प्रमाणपत्र किंवा ठेकेदार / विकासक याचे प्रमाण पत्र .