नमस्कार, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई या मार्फत नुकतेच भांडी वाटप तसेच गृह उपयोगी साहित्य वाटप सुरू करण्यात आले आहे. अहमदनगर येथे आजपासून 13/02/2024 भांडी वाटप सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कुकर सह पाण्याची टाकी असे मिळून 30 प्रकारचे वस्तु ( नग ) यामध्ये आहेत.
बांधकाम कामगार यांना आजपासून भांडी वाटप सुरू
या भांडी योजने साठी अथवा गृह उपयोगी साहित्य मिळवण्यासाठी काही कागद पत्रे आवश्यक आहे यामध्ये आधार कार्ड, बांधकाम कामगार कार्ड, १ रुपया भरल्याची पावती आणि रेशन कार्ड हे महत्वाचे कागद पत्रे यामध्ये घेण्यात आले आहे. या सोबत एक फॉर्म ( प्रती मा. सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर या नावाने आहे ) या फॉर्म मध्ये भांडी मिळणे करीता तारीख आणि वार हे दिले आहे. त्यानंतर दुसरा एक फॉर्म आहे त्याचे नाव आहे ” हमी पत्र “.
हे हमी पत्र प्रपत्र – ई नावाने आहे. या हमी पत्रात ३० नग मिळणार असा उल्लेख आहे. सोबतच कुटुंबात किती जणांची नोंदणी आहे असेल तर या ठिकाणी नावे टाकायची आहेत. आणि या गृह उपयोगी वस्तू योजने मार्फत कुटुंबातून फक्त एकच जन लाभ घेणार आहे असा उल्लेख केलेला आहे. ( दोन्ही कागद पत्रे खाली दिलेली आहे ) आणि सोबत हे वस्तु मला सुस्थितीत मला मिळाले आहे. असा उल्लेख केलेला आहे.
भांडी मिळण्यासाठी आवश्यक कागद पत्रे Bandhkam Kamagar Bhandi Vatap Yojana :
१) आधार कार्ड झेरॉक्स
२) बांधकाम कामगार कार्ड झेरॉक्स
३) १ रुपयाची पावती झेरॉक्स
४) रेशन कार्ड झेरॉक्स
५) हमी पत्र ( खाली दिलेले आहे )
६) मंडळा मार्फत भांडी मिळनेकरिता तारीख व वार साठी अर्ज ( खाली लिंक दिलेली आहे क्लिक करून मिळवा ).
बांधकाम कामगार भांडी योजना : भांडी मिळवण्यासाठी अर्ज कसा करणार Bandhkam Kamagar Bhandi Vatap Yojana Application
तुम्ही जर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली असेल ( नवीन व जुनी / नवीन नोंदणी झालेल्यांना पण आणि ज्यांनी रेन्यूअल केलेले असेल ते पण ). त्यांनी हा अर्ज कसा करायचा या बद्दल माहिती पाहू, वरील सर्व कागद पत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील WFC किंवा ज्या ठिकाणी हे बांधकाम कामगार नोंदणी कार्ड घेतले आहे त्या ठिकाणी जाऊन हा अर्ज देयायचा आहे. ते तुम्हाला एक तारीख देतील त्या दिवशी तुम्ही पुन्हा नवीन वरील कागद पत्रांचा बंच करून ज्या ठिकाणी पेटी मिळाली त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे तेथे गेल्यावर काही सहिसह तसेच बायोमेट्रिक पडताळणी करून तुम्हाला तो सेट देतील.
बांधकाम कामगार भांडी योजना कोणासाठी आहे ?
१) नवीन कामगार असतील त्यांना मिळेल
२) ज्यांनी रेन्यूअल केले असेल त्यांना पण मिळेल
याचा अर्थ असा आहे की ज्यांचे कार्ड सह स्थिती चालू आहे त्या सर्व बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.