Ayushman Card And Mahatma Phule Card big Announcement : नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनाने / 28 जून 2023 च्या महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठीकामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना येथून पुढे प्रत्येक कुटुंबाला 5 लाखाचे एक आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. त्या निर्णयामुळे आरोग्य संदर्भात होणारी हेडसाळ थोडी का होईना आता कमी होणार आहे.
मंत्रिमंडळ निर्णय तसेच त्याचे वैशिष्टये आणि लाभ यासंदर्भात :- ( Ayushman Card And Mahatma Phule Card big Announcement )
● सुरुवातीला महाराष्ट्र मध्ये महात्मा फुले जण आरोग्य योजना ( राज्य ) सोबत आयुष्यमान भारत योजना ( केंद्र ) यासाठी फक्त केशरी आणि अंत्योदय रेशन कार्ड धारक हेच पात्र होते आणि लाभ फक्त याच रेशन कार्ड धारक कुटुंबाना मिळत होता पण राज्य मंत्रिमंडळ 28 जून 2023 च्या बैठीकत आता नवीन निर्णय घेण्यात आला, येथून पुढे आता महाराष्ट्रातील सर्वच रेशन कार्ड धारक किंवा सर्वच नागरिकांना लाभ मिळणार आहे.
● आयुष्यमान भारत योजनेत कटुंबाला 5 लाख रुपये विमा कव्हर मिळत होता आता यासोबत महात्मा फुले योजनेला सुद्धा जास्तीचे 5 लाख रुपये विमा कव्हर मिळणार आहे.
● यामध्ये आजाराची संख्या आणि हॉस्पिटल ची संख्या सुद्धा वाढविली आहे. रस्ते अपघात संख्या 74 वरून 184 एवढी केली आहे, महात्मा फुले जण आरोग्य संख्या 996 आजार आणि आयुष्यमान भारत योजनेची संख्या 1209 असे यामध्ये समाविष्ट असणार आहे.
● मूत्र पिंडाची शस्त्रक्रियेसाठी सुरुवातीला मर्यादा होती ती 2.5 लाख सध्या एवढी आहे ती आता 28 जून 2023 नंतर 4.5 लाख एवढी करण्यात आली आहे