1. उत्पन्न दाखला
- तलाठी उत्पन्न दाखला –
(मागणी नुसार/श्यक्यतो SC/ST – १ वर्ष व OBC/NT/SBC/ESBC – ३ वर्ष काढावा) - रेशनकार्ड झेरॉक्स.
- उत्पन्न नोकरीपासुन असल्यास आय टी रिटर्न अथवा वेतन प्रमाणपत्र इतर व्यक्तींना आवश्यक नाही.
2. वय व अधिवास (Domecile)
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड(जन्मस्थळ आवश्यक)किंवा जन्म प्रमाणपत्र
- तलाठी रहिवासी किंवा ग्रामपंचायत रहिवासी किंवा पासपोर्ट साईज फोटो
- रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक)
वय व राष्ट्रीयत्व ( Age And Nationality certificate)
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड (जन्मस्थळ आवश्यक) किंवा जन्म प्रमाणपत्र
- तलाठी रहिवासी किंवा ग्रामपंचायत रहिवासी किंवा पासपोर्ट साईज फोटो.
- रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक ).
- वय व अधिवास(Domecile)प्रमाणपत्र
उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र ( Non Crimilayar )
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड (जन्मस्थळ आवश्यक) किंवा जन्म प्रमाणपत्र.
- जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत
- रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक)
- तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्न दाखला(उत्पन्न मर्यादा वार्षिक उत्पन्न 8 लाख च्या आत)
ई केवायसी न केल्यामुळे या शेतकऱ्यांचे येणारे 12 हजार रुपये होणार बंद
डोंगरी दाखला
- मराठी शाळेचा रजीष्टर नंबर १ चा दाखला/उतारा
- तलाठी रहिवासी किंवा ग्रामपंचायत रहिवासी किंवा पासपोर्ट साईज फोटो.
- रेशनकार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मध्ये ज्या व्यक्तीच्या नावे दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आवश्यक)
अल्प भूधारक दाखला/शेतकरी दाखला
- जमिनीचा ८ अ उतारा व त्याप्रमाणे सर्व ७/१२ उतारे नवीन काढलेले किंवा डिजिटल उतारे आता आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
- ज्या व्यक्तीच्या नावाने दाखला हवा आहे त्याचा शाळेचा दाखला किंवा बोनफाईड.
- रेशनकार्ड झेरॉक्स.
- मंडलाधिकारी(Circal) शेतकरी अथवा अल्पभूधारक असल्याचा चौकशी अहवाल(त्याची प्रत आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे).
- अल्पभूधारक/शेतकरी असल्याचे स्वघोषनापत्र(त्याची प्रत आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे)
झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन अर्ज, 100% अनुदान अर्ज सुरू
जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड(जन्मस्थळ आवश्यक)किंवा जन्म प्रमाणपत्र.
- वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
- आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला/जन्म नोंद दाखला.
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST)सन १९५० पूर्वीचा पुरावा आवश्यक)
विमुक्त जाती/भटक्या जमाती सन १९६१ पूर्वीचा पुरावा आवश्यक
इतर मागास प्रवर्ग सन १९६७ पूर्वीचा पुरावा आवश्यक
शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग(मराठा आरक्षण)सन १९६७ पूर्वीचा पुरावा आवश्यक. आजोबांचा दाखला नसल्यास चुलत आजोबा यांचा पण चालेल किंवा महसुली पुराव्यात जुळणारे नातेसंबंधातील दाखला) - पणजोबांचा दाखला(आवश्यक असल्यास)
- वंशावळ स्वघोषनापत्र(त्याची प्रत आमच्या कार्यालयात उपलब्ध आहे)
शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे
- ज्या व्यक्तीचे नाव समाविष्ट करायचे आहे त्या व्यक्तीचा जन्माचा दाखला किंवा बोनफाईड.
- सुनेचे नाव टाकायचे असल्यास माहेरील शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याचे दाखला.
- आधार कार्ड.
- ज्या शिधपात्रिकेत नाव टाकायचे आहे ती मूळ (ओरिजनल)शिधापत्रिका
शिधापात्रिकेत नाव कमी करणे
- मुलीचे लग्न झालेले असल्यास तिचा शिधापत्रिकेतून तलाठी यांनी दिलेला नाव कमी केल्याचा दाखला.
- ज्या शिधापत्रिकेतून नाव कमी करायचे आहे ति ओरिजनल शिधापत्रिका.
- आधार कार्ड झेरॉक्स.
EWS आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गात मोडत असल्याचे प्रमाणपत्र
- ज्या मुलाचा/मुलीचा ज्याच्या नावाने दाखला हवा आहे त्याचा शाळेचा दाखला झेरॉक्स.
- वडिलांचा शाळेचा दाखला झेरॉक्स.
- आजोबांचा शाळेचा दाखला झेरॉक्स.
- मा तहसीलदार यांचा ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
- रु १०० चा स्टॅम्प पेपर.
- रेशनकार्ड झेरॉक्स.
- मुलाचा/मुलीचा व वडिलांचा प्रत्येकी १ फोटो.
नवीन आधार कार्ड काढणेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखीच्या पुराव्यासाठी – ( खालीलपैकी कोणताही १ ) ( १) मतदान कार्ड
२) पॅन कार्ड
३) पासपोर्ट
४) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक(फोटो व शिक्का आवश्यक) - पत्त्याच्या पुराव्यासाठी – (खालीलपैकी कोणतेही १) ( १) मतदान कार्ड
२) रेशनकार्ड
३) पासपोर्ट
४) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक(फोटो व शिक्का आवश्यक).
जन्म तारखेत बदल करण्यासाठी
- जन्माचा दाखला ओरिजनल
- आधार कार्ड बायोमेट्रिक/मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी
- आधार कार्ड व स्वतः व्यक्ती
पॅन कार्ड
- आधार कार्ड अपडेट असल्यास फक्त आधार कार्ड व त्या मोबाईल ला लिंक असलेला मोबाईल.
- आधार अपडेट नसल्यास २ फोटो आधार कार्ड (आधार कार्ड वर पूर्ण जन्म तारीख आवश्यक)
( पॅन कार्ड दुरुस्ती नाव/जन्म तारीख – ( आधार कार्ड पूर्णपणे अपडेट पाहिजे. ))